नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )
घटक - १ ला *नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप* प्रास्ताविक - मराठी नाटकाचा विचार करू जाता मराठी नाटकाची परंपरा फार प्राचीन असल्याचा प्रत्यय येतो.अगदी भरतमुनींनी आपल्या साहित्यविचारात प्रामुख्याने नाटकाचाच विचार केला आहे.भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाला नाटकाच्या परंपरेचा पाया मानला जातो. संस्कृत नाटके, राजदरबारातील प्रयोग आणि लोककला यांचा मराठी नाटकावर प्रभाव प्रतीती येते. आचार्य भरतमुनी यांनी मांडलेले रससूत्र हे नाटकाच्या संदर्भातलेच आहे.संस्कृत नाटकाच्या अनुषंगाने मांडलेला हा रसविचार मराठी नाटकालाही उपयुक्त ठरतो.किंबहुना मराठी नाटकाकरिता आजही या रससूत्र उपयुक्त ठरते . मराठी नाटकाचा विकास दशावतार, भारूड, कीर्तन, लावणी, गोंधळ, तमाशा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, चित्रकथी अशा लोककला प्रकारांतून झालेला दिसतो. अर्थातच प्राचीन भारतीय नाट्यकलेशी आणि लोककलांशी ही परंपरा जोडलेली दिसते.मराठी नाट्यपरंपरेचा शोध घेताना विधीनाट्य ,संतांच्या भारुड रचना,महदंबेचे धवळे,बुकीश नाटके ,विष्णुदास भावे यांचे ओबडधोबड स्वरूपाचे नाटक असा प्रवास लक्षात घ्यावा लागतो. आधुनिक मराठी नाटकाची सुरुव...