Posts

Showing posts from March, 2026

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप(भाग - १ )

घटक - १ ला *नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप* प्रास्ताविक - मराठी नाटकाचा विचार करू जाता मराठी नाटकाची परंपरा फार प्राचीन असल्याचा प्रत्यय येतो.अगदी भरतमुनींनी आपल्या साहित्यविचारात प्रामुख्याने नाटकाचाच विचार केला आहे.भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथाला नाटकाच्या परंपरेचा पाया मानला जातो. संस्कृत नाटके, राजदरबारातील प्रयोग आणि लोककला यांचा मराठी नाटकावर प्रभाव प्रतीती येते. आचार्य भरतमुनी यांनी मांडलेले रससूत्र हे नाटकाच्या संदर्भातलेच आहे.संस्कृत नाटकाच्या अनुषंगाने मांडलेला हा रसविचार मराठी नाटकालाही उपयुक्त ठरतो.किंबहुना मराठी नाटकाकरिता आजही या रससूत्र उपयुक्त ठरते . मराठी नाटकाचा विकास दशावतार, भारूड, कीर्तन, लावणी, गोंधळ, तमाशा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, चित्रकथी अशा लोककला प्रकारांतून झालेला दिसतो. अर्थातच प्राचीन भारतीय नाट्यकलेशी आणि लोककलांशी ही परंपरा जोडलेली दिसते.मराठी नाट्यपरंपरेचा शोध घेताना विधीनाट्य ,संतांच्या भारुड रचना,महदंबेचे धवळे,बुकीश नाटके ,विष्णुदास भावे यांचे ओबडधोबड स्वरूपाचे नाटक असा प्रवास लक्षात घ्यावा लागतो. आधुनिक मराठी नाटकाची सुरुव...

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप (भाग - २ ) - नाट्यघटक व अभिनय

घटक - २ *नाट्यघटक व अभिनय* कथात्म साहित्यातील कथा कादंबरी या साहित्य प्रकारापेक्षा नाटकाचा पृथगात्मकतेने विचार करावा लागतो.कथात्म साहित्याचे काही समान गुणविशेष नाटकात असले तरी कथा कादंबरीपेक्षा काही वैशिष्ट्ये ही वेगळीच आहेत.संवाद हे नाटकाचे मूलद्रव्य आहे आणि संवादाच्या माध्यमातून व पात्रांच्या अभिनयातून नाट्य प्रयोग साकारत जातो.प्रयोगाच्या वेळी नाटकाच्या मुख्य घटकांबरोबरच दिग्दर्शन व दिग्दर्शक आणि प्रेक्षक व प्रेक्षागृह याचाही विचार या घटकाच्या अनुषंगाने करावा लागतो.तरच त्या नाट्यकलाकृतीचे व्यवस्थित परीक्षण परीक्षकाला करता येते.म्हणून इथे काही महत्त्वाच्या नाट्य घटकांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. *१)संविधानक* कादंबरीत व कथेत कथानक असते.नाटकातील कथानकाला मात्र संविधानक असे संबोधले जाते.संविधानक हा नाटकाचा कणा असतो.यात घटना,प्रसंग, वळणं व उत्कंठावर्धकता या सर्वांचा समावेश होतो.कथानक म्हणजे नाटकात घडणाऱ्या घटनांचा शृंखलाबद्ध क्रम जो कथेला युक्तीपूर्ण वाटचाल देतो.म्हणून नाटकांमध्ये संविधानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. न्यायशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार, "...

नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप